Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याCongress Working Committee : काँग्रेसची वर्किंग कमिटी जाहीर, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा समावेश

Congress Working Committee : काँग्रेसची वर्किंग कमिटी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून काँग्रेसची वर्किंग कमिटी जाहीर करण्यात आली आहे. ३९ सदस्यांच्या या समितीत सोनिया, राहुल, प्रियंका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही समितीत कायम ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे खर्गे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शशी थरूर यांनाही या समितीत स्थान दिले आहे. तसेच नाराज असलेसे राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचा देखीस या कमिटीत समावेश करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील या कमिटीत समावेश आहे.

खर्गे यांनी २० ऑगस्ट रोजी प्रेस नोट रिलिझ केली आहे. यात काँग्रेस वर्किग कमिटीतील नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. यादीमध्ये काँग्रेस नेते सचिन पायलट, शशी थरुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, पी. चिदंबरम, अशोक चव्हाण, आनंद शर्मा, दिग्विजय सिंग, यशोमती ठाकूर, अल्का लांबा, प्रणिती शिंदे, पवन खेरा, गणेश गडीयाल, रणदीप सिंग सुरजेवाला, तारिक अनवर, गौरव गौगाई, के सी वेणूगोपाल यांच्यासह एकूण ३९ नावांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या