मुंबई / प्रतिनिधी

पुढील वर्षी होऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी बुधवारी केला. निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी आम्ही वॉर्डनिहाय आढावा घेत आहोत आणि एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले....

मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत तर राज्यात सत्तेत भागीदार आहोत. राज्यातील महाविकासआघाडी किमान समान कार्यक्रमावर चालत आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे मुंबईतील २२७ जागांवर लढण्याचा मानस मी मुंबई अध्यक्षपाची सूत्रे हाती घेयली तेव्हाच व्यक्त केला होता, भाई जगताप म्हणाले.

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी जगताप यांनी केली. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १६८ कोटी रुपयांचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.