काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला! बाळासाहेब थोरातांनी दिला राजीनामा?

काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला! बाळासाहेब थोरातांनी दिला राजीनामा?

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra politics) केंद्रबिंदू ठरत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) राजकीय लढाई निवडणूक आटोपल्यानंतरही संपायला तयार नाही.

याच दरम्यान बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला! बाळासाहेब थोरातांनी दिला राजीनामा?
'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी (satyajeet tambe) अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती.

तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सूचक भाष्य केले. नाना पटोले म्हणाले, गेल्या काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, काँग्रेस हायकमांडचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही प्रकारे वेगळे पाऊल उचलू नये यासाठी पक्षाचे (कँग्रेस) नेतृत्व प्रयत्नशील असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला थोरात यांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बाळासाहेब थोरात अद्याप तरी राजीनाम्यावर ठाम असल्याचे समजते. शिवाय हायकमांडला लिहिलेल्या पत्रात आपण राजीनामा दिला असला तरी यापुढेही काँग्रेसच्या विचारांनीच पुढे जाणार असल्याचे थोरात यांनी म्हटल्याचे दिल्लीतील सूत्रे सांगत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com