विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमदेवार जाहीर

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमदेवार जाहीर

मुंबई | Mumbai

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha election) धुम सुरू आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर २० जून रोजी राज्यातील १० विधान परिषदेच्या (MLC election) जागांसाठी निवडणुक होईल. दरम्यान भाजप (BJP) पाठोपाठ काँग्रेसनेही (Congress) उमेदवार घोषित केले आहेत.

काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी ज्या नावांची चर्चा होती त्यामध्ये मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांचा समावेश होता. मात्र अधिकृत यादी जाहीर झाली असून त्यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून ५ उमेदवारांची नावे निश्चित

भाजपकडून विधान परिषदेसाठी ५ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com