Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनंदुरबार : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

नंदुरबार : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे पेट्रोलपंपांसमोर जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. सदर दरवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

- Advertisement -

नंदुरबार येथील पेट्रोलपंपांसमोर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी निषेध आंदोलन करत केंद्र सरकारविरोधी घोषणा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी.गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केलेली आहे. पेट्रोलने आधीच शंभरी पार केली असून, डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. सदर दरवाढ अशीच सुरु राहिल्यास डिझेल देखील शंभरी पार करेल. एल. पी.जी.गॅस च्या एका सिलींडरची किंमत 900 रुपयांवर जाऊन पोहचली आहे. या दरवाढीमुळे सर्व वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. महागाईमुळे देशातील सामान्य जनतेचे जगणे मुश्किल होणार आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे केद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. केंद्र शासनाने पेट्रोल, डीझेल व गॅसच्या किंमतीत केलेली दरवाढ तात्काळ मागे घेऊन सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नवापूर

नवापूर शहरात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत पेट्रोल पंपासमोर आंदोलन केले.

यावेळी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, न.पा बांधकाम सभापती आरीफ बलेसरीया, जयवंत गावीत, सलामजी गावीत, राजु वसावे, ठाकुर मावची, राजेश गावीत, दशरथ गावीत, कृष्णा गावीत, दावतसिंग वसावे, प्रेमलाल वसावे, राहुल गावीत, फिलीप गावीत, इकबाल पठाण, किरण गावीत, योगेश मावची उपस्थित होते. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शन खाली पो.हे कॉ निजाम पाडवी,चंद्रशेखर चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या