इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे देशभरात आंदोलन
राजकीय

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे देशभरात आंदोलन

पुण्यात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - देशात सतत होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अनलॉक-1 नंतरही अनेक उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे. मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसूली करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसने सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली.

पुण्यातही काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, पटणा, बंगळुरू आदी प्रमुख शहारांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरूवात झाली आहे.

काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनाला पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

पुण्यातील काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनला पोलिसांची परवानगी दिलेली नव्हती. अर्ज देऊनही पोलिसांनी त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही. आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आज अमरावतीत काँग्रेसच्यावतीने अमरावतीच्या इर्विन चौकात धरणे आंदोलन सुरु केले आहेत. इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी इंधनाचे दर कमी करा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित आहेत.

गडचिरोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढीवरून स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करत मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा केला आरोप करण्यात आला. कोरोना काळात उत्पन्न नसताना इंधन दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. तातडीने इंधन दरवाढ मागे घेण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.

दरम्यान अहमदाबादमध्येही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला. बंगळुरूमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सायकल चालवत आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह रवाना झाले.

Deshdoot
www.deshdoot.com