समन्वयाच्या अभावामुळे लसीकरणाचा सावळा गोंधळ - प्रवीण दरेकर

समन्वयाच्या अभावामुळे लसीकरणाचा सावळा गोंधळ - प्रवीण दरेकर

मुंबई -

पालिकेच्या समन्वयाच्या अभावामुळे मुंबईत लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरु असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी भाजपचे नेते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना भेटणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांच्यासह पालिकेचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि भाजपचे नेते पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी समन्वयाचा अभाव असल्याने मुंबईत लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरु असल्याची टीका केली. मुंबईत आजही लसीकरण केंद्र कुठे आहेत? लसी कधी उपलब्ध होणार याची माहिती मुंबईकरांना नाही आहे. योग्य समन्वय नाही आहे. पहिला डोस घेतलेले वृद्ध नागरिक दुसर्‍या डोससाठी केंद्रावर जात आहेत. काही ठिकाणी तर केंद्रावर लस आहे तिथे माणसंच नाही आहेत. याचा अर्थ समन्वयचा अभाव आहे. काही ठिकाणी लसीकरण केंद्र दिली आहेत, ती अर्धवट केंद्र आहेत. त्यामुळे ही लसीकरण केंद्र सरसकट चालू झाली पाहिजेत. तसंच सरसकट मोफत लसीकरण कसं करणार आहात यासंदर्भात आयुक्तांना तपशिलवार विचारणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com