शिवसेनेकडून ३९ आमदारांविरोधात तक्रार, शिंदे गटानेही दिले पत्र; ‘वाचा’ काय घडलं विधानसभेत?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे…

मात्र, शिवसेनेने (shivsena) व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (sunil prabhu) यांनी दिली आहे.

तसेच शिंदे गटाकडूनदेखील 16 आमदारांनी व्हीप मोडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) उमेदवाराला मतदान केले. याबाबत शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे तक्रार केली आहे.

सभागृहात ‘तो’ मेसेज वाचत भुजबळांचा अमित शाहांना टोला

विधानसभेच्या नियमानुसार पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान (Voting) केले आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे.

आम्ही सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती प्रभू यांनी दिली.

नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. शिवसेनेतील (Shivsena) 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान (Voting) केलेले आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *