फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी समिती गठीत

बेकायदा फोन टॅपिंगची होणार चौकशी
फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी समिती गठीत
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Former Chief Minister Devendra Fadnavis )सरकारच्या कालावधीत म्हणजे २०१४ ते २०१९ या दरम्यान लोकप्रतिनिधींचा फोन बेकायदा टॅप ( illegally Phone tapping ) करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती काँग्रेस आमदार नाना पटोले ( MLA Nana Patole ) यांच्या तक्रारीचीही चौकशी करणार आहे.

गृह विभागाने शुक्रवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. समितीला चौकशी अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या समितीत गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आणि विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचाही समावेश आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य नाना पटोले यांची फोन टॅपिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आघाडीच्या आमदारांचा फोन बेकायदा टॅप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात शुक्ला यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com