पवारांचे मोदींना पाचव्यांदा पत्र
राजकीय

पवारांचे मोदींना पाचव्यांदा पत्र

सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

sukhdev fulari

sukhdev fulari

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांना पवारांनी लिहिलेले हे पाचवे पत्र आहे.

शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून सहकारी बँका वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत,याच्याशी पंतप्रधानही सहमत असतील, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. सहकारी बँकांनी देशात बँकिंग साक्षरता वाढविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असंही शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

शरद पवार पत्रात म्हणाले की, 'स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सहकारी बँकांचा उल्लेख केला. मध्यमवर्गीयांच्या हितासाठी केंद्र सरकारने सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे तुम्ही सांगितले. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो.' पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सहकारी बँकांची परंपरा शंभर वर्षांची आहे. सहकारी बँका सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून पहिल्यांदा पाहिल्यावर रिझर्व्ह बँकेचे आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून आखलेले सहकारी बँकांबाबतचे धोरण अस्पृश्यतेचं राहिलं आहे.

सहकारी बँकांचं सहकारपण कायम रहावं...

शरद पवार यांनी सहकार बँका वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'सहकारी बँकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढ आहे. सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसेच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील.'

खासगी बँकेत बदल केल्यास समस्या सुटत नाही....

'सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलल्याने समस्या सुटणार नाही. सहकारी बँकामध्ये आर्थिक शिस्त आणण्याचीही गरज असल्याचे म्हटले जाते, मात्र सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची भीती असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच 2019 ते 20 या आर्थिक वर्षांत सहकारी क्षेत्रांत गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा करत शरद पवारांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारीही दिली आहे. तसेच या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणीही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com