‘आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको…’; दगाबाजीवर उद्धव ठाकरेंकडून सूचक इशारा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । Mumbai

शिवसेना आज आपला ५६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दगाबाजीवर सूचक शब्दात भाष्य करताना भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

‘राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलेलं नाही. मग नेमकं कोणाचं मत फुटलं त्याचाही अंदाज आम्हाला आला आहे. कोणी काय कलाकारी केली आहे, याचा हळूहळू उलगडा होणारच आहे. उद्याच्या निवडणुकीत कोणतीच फाटाफूट होणार नाही, कारण आईचं दूध विकणारा शिवसेनेत नको, असे बाळासाहेबांचे शब्द सांगत त्यांनी गद्दारी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला.

तसेच ‘उद्याच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या नंतर हे अजून मोठं चित्र दिसलं पाहिजे,’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अग्निपथ योजनेवरून त्यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे. ‘आज भाड्यावर सैनिक घेत आहात. उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणणार का? भाडोत्री सरकार आणणार का? मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे असे टेंडर काढणार का? नाहीतरी दर पाच वर्षांनी नागरिकांना मते मागाला जावचं लागते, असा टोला यांनी लगावला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *