Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्राकडून सापत्न वागणूक; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

केंद्राकडून सापत्न वागणूक; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी करोना संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या बैठकीत सहभागी झाले होते.

- Advertisement -

या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन बिगर भाजप शासीत राज्यांना सुनावलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त करत राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘मोदींनी पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला. मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे.’

तसेच, महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या