उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली! वाचा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली! वाचा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई । Mumbai

आज मुंबईतील बीकेसी (Mumbai bkc ) येथील शिवसेनेच्या (Shivsena) सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चौफेर फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाने सर्वकष मुद्यांवर घणाघात केला. चौफेर फटकेबाजी करताना त्यांनी विविध मुद्यांवरून विरोधकांवर हल्ल्यावर हल्ले चढविले.

फडणवीसांच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत बाबरी मशिदीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती. कारसेवकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तर बाबरी मशीद खाली आली असती, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं

तसेच मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरे यांना टोले लगावले. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. भगवी शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत, असा टोला उद्धव ठाकेरे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

तर दाऊद भाजपात मंत्री होईल'

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. केंद्र सरकार आता दाऊदच्या मागे लागले आहेत, पण दाऊद जर का बोलला मी भाजपात येतो, तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्यांच्या मागे लागले असतील, ईडी, बीडी आहेत ती आमचीच लोकं आहेत, आमच्यात ये मग तुला मंत्री बनवतो. आणि बोलतील दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा

राहुल भटला जिथे मारले तिथे काय हनुमान चालिसा म्हणायचे? हे काश्मीर फाईल्सचे पुढचे पाऊल आहे काय? आता उज्ज्वला योजना सिलेंडर हजार रूपये. लाज लज्जा नाही केवळ लोकांना भ्रमिष्ट करायचे भाजपचे हिंदुत्व आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने कोण जाणार

बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने कोण जाणार असा सवाल करत कारशेड होण्यासाठी केंद्रात जाऊन बोंबला असे आवाहनच भाजपला केले. तसेच यावेळी मुंबई मराठी माणसाची असून अडवणूक केंद्रातून केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Stories

No stories found.