“मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; असं उद्धव ठाकरे का म्हणाले?

“मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; असं उद्धव ठाकरे का म्हणाले?

मुंबई | Mumbai

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन भाषण करत शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना आपण स्वत: कमी पडल्याची कबुली पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना केली. मी सुद्धा गुन्हेगार असल्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष युतीत सडल्याचाही उल्लेख पुन्हा एकदा केल्याचं पहायला मिळालं. तसेच आता कार्यकर्त्यांनी मार्चमधील निवडणुकांसाठी तयार रहावे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

“मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; असं उद्धव ठाकरे का म्हणाले?
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, 'मी माझ्यापासून सुरू करतो. मी सुद्धा तसं पाहिलं तर गुन्हेगार आहे. मी तरी कुठे फिरलो? यावेळचा भाग वेगळा आहे, पण इतर वेळेला मी सुद्धा तसं काही लक्ष दिलेलं नाही. नाही आपल्या कोणत्या नेत्याने एखाद दुसरा सोडला तर लक्ष दिलेलं आहे. आता हे यापुढे टाळले पाहिजे. गेल्या दोन वर्षात दोन विधानपरिषदा आपणच आपल्या हरलो. कशा हरलो?' असा प्रश्न उद्धव यांनी शिवसैनिकांना विचारला.

तसेच, 'काहीजण सांगतात तुमच्यातच गद्दारी झाली. मला नाही वाटत... जे शिवसेनाप्रमुख म्हणायचे तशी आईचं दूध विकणारी औलाद आता आपल्यामध्ये आहे असे मला वाटत नाही. आणि असेल तर त्यांनी अशी गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्तपणे शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही. जे शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांच्या मदतीने त्या मुठभर शिवसैनिकाच्या हातात मी अभिमानाची आणि स्वाभिमानाची तलवार देऊन निवडणुका जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही या जिद्दीने मी मैदानात उतरलेलो आहे.' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; असं उद्धव ठाकरे का म्हणाले?
PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ 'श्रीवल्ली' पाहिलीत का?

भाजपला फटकारे

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवरही टीकेचे बाण डागले. देशात गुलामगिरीचं वातावरण तयार केलं जात असून, गाढवं किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, तसंच यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय,' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'सुरूवातीच्या काळामध्ये जेव्हा बाबरी पाडली होती. त्या वेळी सर्वजण पळाले होते. हे मी वारंवार सांगतोय, कारण आता नवीन पिढी आली आहे. नव हिंदुत्वावाद्यांकडेही नवी पिढी आली आहे. त्यांना असं वाटतंय की, आपणच एकटे हिंदुत्वाचे शिलेदार आहोत. हे सगळे भंपक आहेत. पण बाबरी पाडल्यानंतर 'गर्व से कहो हम हिंदू है' आणि 'बाबरी पाडलेल्यांचा मला अभिमान आहे', असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा शिवसेनेची देशभर लाट उसळली होती. तेव्हा जर आपण महाराष्ट्रबाहेर सीमोल्लोंघन केलं असत, तर न जाणो आज शिवसेनेचा पंतप्रधान दिल्लीत दिसला असता. एवढी प्रचंड लाट त्यावेळी होती,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; असं उद्धव ठाकरे का म्हणाले?
Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com