कर नाही त्याला डर कशाला; राऊतांच्या ईडी चौकशीवर CM शिंदेंची प्रतिक्रिया

कर नाही त्याला डर कशाला; राऊतांच्या ईडी चौकशीवर CM शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीची (ED) धाड पडली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक सकाळी ७ च्या सुमारास संजय राऊतांच्या मुंबईतील (Mumbai) घरी सीआरपीएफ (CRPF) जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं. गेल्या ६ तासांपासून राऊत यांची चौकशी सुरू आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे.

दरम्यान संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या औरंगाबादमध्ये असून ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांना माध्यमांनी याबद्दल प्रश्न विचारले.

यावेळी ते म्हणाले की, चौकशी सुरू आहे ना, अटक होणार की नाही हे मला माहित नाही, मी काय तिकडचा अधिकारी नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या. ते तर म्हणालेत ना की मी काही केलेलं नाही. ते म्हणत होते, मी चौकशीला सामोरं जाणार. कर नाही, त्याला डर कशाला. काय व्हायचं ते होऊद्या.'

तसेच, 'केंद्रीय तपास संस्थांनी यापूर्वी देखील काही कारवाई केल्या आहेत. त्यांनी सुडाने काम केलं असतं, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती तर न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. यापूर्वीच्या देखील कारवाया तपासून घ्या. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं त्यात एक तरी सुडाची कारवाई केली का? आमच्यापैकी एका आमदाराने तरी सांगितलं का की ईडीने नोटीस पाठवली म्हणून आम्ही तिकडे गेलो. असं कुणी म्हणालं का?' असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com