Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याPFI वर बंदी; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

PFI वर बंदी; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नाशिक | Nashik

भारतात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात पीएफआयवर (Popular Front of India – PFI) पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ पासून लागू झाली आहे. भारतात बेकायदा कारवायांकरिता संघटीत झाल्याप्रकरणी (Unlawful Association) ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान पीएफआयवर घातलेल्या बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, केंद्र आणि राज्यातील गृहखातं चांगलं काम करत असून राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या