'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | Mumbai

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta Foxconn Semiconductor Manufacturing Project) आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Govt) काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे (BJP) गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या या आरोपानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले.

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाचं खापर महाविकास आघाडीच्या माथी फोडलं. मुख्यमंत्री म्हणाले की, 'आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असं बोलणं झालं होतं. त्यानंतर तळेगावमध्ये जवळपास अकराशे एकर जमीनदेखील आम्ही देऊ केली होती.'

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'पण गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करणार आहेत. तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com