“अगर इसके बाद कूच भानगड करने का प्रयास किया तो...”; शिंदे गटातील आमदाराची ठाकरे गटाला धमकी

पण धमकी पेक्षा त्यांच्या हिंदी जास्त चर्चा
“अगर इसके बाद कूच भानगड करने का प्रयास किया तो...”; शिंदे गटातील आमदाराची ठाकरे गटाला धमकी

मुंबई | Mumbai

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे.

त्यात आता शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडत असल्याचं चित्रही समोर आले आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. मात्र, धमकी देताना त्यांनी ज्या हिंदी शब्दांचा वापर केलाय त्याचीच जास्त चर्चा आता होत आहे.

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले की, 'शिवसेना (Shivsena) के लोग पातळी छोडकर बात कर रहे हैं. आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोख लिया, उनको पता नही है की, संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है. ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है. अगर वो खवल जाते तो किसीके बाप को बाप समजते नही. अगर इसके बाद इन्होंने कूच भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारे जायेगे. वो तो सौभाग्य है की पुलिस बीच मे थी.' अशा हिंदी भाषेत गायकवाड यांनी आपल्या शैलीत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.

बुलढाण्यात नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बुलडाण्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या नियुक्त्या बुलडाण्यात करण्यात आल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना कार्यक्रमाता घुसळ्याचे सांगितले जात आहे. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com