शिंदे- फडणवीसांमध्ये रात्री दोन तास खलबतं; प्रभादेवीच्या राड्याची चर्चा?

शिंदे- फडणवीसांमध्ये रात्री दोन तास खलबतं; प्रभादेवीच्या राड्याची चर्चा?

मुंबई l Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या 'वर्षा' (Varsha) या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. दोघांमध्ये जवळपास दोन तास राज्यातील विविध विषयांवर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील (Mumbai) प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात खलबत झाल्याची माहिती मिळाली. शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच मुंबई मनपामध्ये भक्कम पाय रोवलेल्या शिवसेनेला टक्कर देण्याची आगामी निवडणुकीबाबत रणनिती आखल्याचे समजते. तसेच बारा आमदारांच्या यादीवर चर्चा करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील धुसफूस आता चांगलीच वाढू लागली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद टोकाला गेल्याचं दिसून येतं आहे. शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. त्यानंतर रविवारी दुपारच्या दादर परिसरातील आमदार सदा सरवणकर यांच्या दादर येथील कार्यालयावर काही लोकांनी दगडफेक केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेरील बॅनर देखील फाडण्यात आले आहेत. तसेच सदा सरवणकर यांचा पुत्र समाधान सदा सरवणकर यांचाही बॅनर फाडण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com