विधानसभा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा

निवडणूक आवाजी मतदानाने होणार
विधानसभा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

येत्या २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात winter session of the state legislature विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक Election of Assembly Speaker घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. विधानसभा नियम समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलण्याचा निर्णय झाला असून आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नियम बदलाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचेही कळते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या लांबलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियम समितीची ही बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलत तो आता आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या बैठकीत भाजप सदस्य डॉ संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, सुधीर गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे.

महाराष्ट्रातही अशी पद्धत असताना आता ती बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जातो, असा मुद्दा भाजपच्या सदस्यांनी बैठकीत उपस्थित केला. महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवण्याचे काम करते. विधानसभेच्या अमृत महोत्सवी वर्षात हा नियम बदलण्यामागचे नेमके कारण काय? असा सवालही भाजप सदस्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. मात्र ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेताना काही आमदार फुटण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटते. अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव संमत करायचा असेल तर सभागृहात बहुमताची गरज आहे. महाविकास आघाडीकडे २८८ पैकी १७० इतके संख्याबळ आहे. तर भाजपचे विधानसभेत १०६ सदस्य आहेत. गुप्त मतदान पद्धतीत १७० चा आकडा कायम राहणार नाही अशी महाविकास आघाडीला शंका वाटते.

बहुमत सिद्ध करताना असलेले १७० चे आघाडीचे संख्याबळ जर विधानसभा अध्यक्ष निवडीत घटले तर सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक लावून धरू शकतात. त्यामुळेच निवडणूक घेण्याच्या आधीच नियमात बदल करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव होता. त्यानुसार आता गुप्त मतदानाऐवजी आवाजी (हात वरती करत, उघड पद्धतीने) पद्धतीने मतदान करण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असून प्रस्ताव मंजूर झाल्यास विधानसभा अध्यक्ष निवडीचा मार्ग राज्य सरकारसाठी सुकर होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com