भाजप पदाधिकारीची नियुक्ती; निवडणूक आयाेगाकडून क्लिन चिट
राजकीय

भाजप पदाधिकारीची नियुक्ती; निवडणूक आयाेगाकडून क्लिन चिट

फेसबुक पेज प्रकरण

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai - राज्यातील विधानसभा निवडणूक 2019 च्यावेळी Maharashtra Assembly Election 2019 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या Election Commission of India समाजमाध्यमावरील फेसबुक पेज हाताळण्याचे काम भाजप जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याच्या कंपनीला देण्यात आले होते, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तसंच या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या आपल्या अंतरिम अहवालात याप्रकरणी भाजपला क्लिन चीट दिली आहे.

काँग्रेसनं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. तसंच हे प्रकरण वाढल्यानंतर मुख्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी हा अहवाल मुख्य निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. अहवालात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आणि देवांग दवे यांच्यादरम्यान कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याला नकार दिला आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचं कार्यालय आणि डीजीआयपीआर (डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन, महाराष्ट्र) यांच्याकडून सोशल सेंट्रल मीडिया या कंपनीला कोणत्याही प्रकारचं कंत्राट दिलं नसल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सीईओ कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेसर्स साईनपोस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची कामासाठी डीजीआयपीआरनं नियुक्ती केली होती. ही संस्था सरकारी विभागांच्या सर्व जाहिरांतींसाठी संस्थांची निवड करते. जाहिरातींसाठी संपूर्ण नियमांच्या अधिन राहून निविदा काढल्या जातात. स्वीप कॅम्पेनची निविदा कोणाला देण्यात यावी यासाठी सीईओ कार्यालयानं डीजीआयपीआरशी संपर्क केला होता. या कॅम्पेनमध्ये सोशल मीडियावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी जाहिराती देण्यात आल्या होत्या.

यानंतर सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसंच गोखले यांच्या मुद्द्यांच्या आधारावर काँग्रेसनेही तो मुद्दा उचलला होता. गोखले यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. 2019 च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांदरम्या सोशल मीडिया अकाऊंट चालवण्यासाठी निवडणूक आयोगानं ज्या संस्थेची निवड केली होती ती तिच संस्था होती ज्याला भाजपानंही कंत्राट दिलं होतं. तसंच ती संस्था भाजपाचा युवा मोर्चाचे नेते देवांग दवे यांची आहे, असंही ते ट्विटमध्ये म्हणाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com