आत्ता ट्रेलर, टिझर काहीही नाही… २२ तारखेला सिनेमाच दाखवतो; राज ठाकरेंची गर्जना

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

या घडामोडींबाबत आज एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आणि निवडणूक आयोगातील निर्णयावर येत्या २२ तारखेला भाष्य करेन त्यामुळे आत्ता ट्रेलर, टिझर काहीही नाही. थेट २२ तारखेला सिनेमा दाखवतो, असं राज ठाकरे म्हणाले. यावरुन निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असला तरी भविष्यात असे निर्णय नको, अशीच भूमिका राज ठाकरे मांडणार असा अंदाज बांधला जात आहे. २२ तारखेच्या राज ठाकरेंच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठी भाषा दिनानिमित्त पनवेलमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी पूर्वी या सर्व गोष्टी समोरासमोर व्हायच्या असं म्हटलं. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चिखल झालाय. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. ज्या काही गोष्टी असतील, विरोध वगैरे या सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या. मी विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी गेलो होतो. खाली सगळे बसले होते. मला कळतच नव्हतं की कोण कुठल्या पक्षात आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी यावेळी केली. सध्या कुणी आला की साहेब मी आमदार आहे, तर त्याला कुठला? असं विचारावं लागतं. सध्या तो अमका कुठे असतो? विचारलं तर ‘नाही तो तिकडे गेला ना आता’ असं उत्तर येईल, असंही ते म्हणाले.

Marathi Bhasha Gaurav Din : “…त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी”; राज ठाकरेंनी घातली मराठी भाषिकांना साद

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंना अजित पवारांच्या एका विधानाविषयी प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट या वादाबाबत ‘एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील तर काय निर्णय देणार? मनसेचे उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. या एका आमदाराने उद्या मनसे पक्ष माझा, इंजिन हे निवडणूक चिन्हही माझेच, असा दावा केला तर तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला होता, तोच निर्णय देणार का?’ असा प्रश्न अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. तसं खरंच होईल का, यासंदर्भात राज ठाकरेंनी विचारणा केली असता त्यांनी त्यावर त्यांच्या मिश्किल शैलीत उत्तर दिलं.

‘गंगामाई’च्या इथेनॉल प्रकल्पातील भीषण आगीचं कारण आले समोर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *