
मुंबई | Mumbai
शिवसेनेची महत्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा येथे पार पडली आहे. या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित होते असे समजते. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी दूर करण्यासाठी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), रवींद्र फाटक सूरतला रवाना झाले आहेत....
एकनाथ शिंदेंसह 35 आमदार सूरतच्या ग्रँड भगवती हॉटेलमध्ये आहेत, असा दावा करण्यात आला आहे. आज सोशल मीडियावर (Social Media) एक यादी व्हायरल झाली असून यात 22 आमदारांची नावे आहेत.
शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरदेखील सूरतला रवाना झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा निरोप घेऊन संजय कुटे (Sanjay Kute) सुरतमध्ये दाखल झालेत.
शिवसेनेच्या (Shivsena) बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन तात्काळ हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्या भूमिकीकडे लक्ष लागले आहे.
भाजपकडून (BJP) त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील राजकीय घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.