मुख्यमंत्री मंत्रालयाला करणार 'जय महाराष्ट्र'?; आज सचिवांसोबत बैठक

मुख्यमंत्री मंत्रालयाला करणार 'जय महाराष्ट्र'?; आज सचिवांसोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल जनतेशी संवाद साधला. रात्री उशिरा त्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले. त्यानंतरही शिवसेनेची (Shivsena) गळती कमी होताना दिसत नाही...

आज सकाळी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अडचणीत आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिंदे गटात इतके आमदार कसे?; काँग्रेस-राष्ट्रवादीची शंका

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार असल्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वावी येथील महावितरणचे कार्यालय जळून खाक

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) थोड्याच वेळात मंत्रालयातील सगळ्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. अडीच वर्ष केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री आभार व्यक्त करणार आहेत. ही मंत्रालय अंतर्गत बैठक असल्यामुळे याचे प्रक्षेपण करता येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com