मी राजीनामा देतो तुम्हीच...; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर

मी राजीनामा देतो तुम्हीच...; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्र्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरेंनी यावर एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे...

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा मी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेना पक्षात परत यावेळ आणि मुख्यमंत्री बनावे, अशी ऑफर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे....

मी राजीनामा देतो तुम्हीच...; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर
राज्यात कुठलाही भूकंप होणार नाही : संजय राऊत

मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतली होती. वर्षा बंगल्यावर आपल्या खाजगी सहकार्‍यांसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली ही भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचे नाही, अशी एकनाथ शिंदेंची मागणी आहे.

मी राजीनामा देतो तुम्हीच...; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर
वर्षावरील बैठकीत 'इतके' आमदार होते उपस्थित; काय झाला निर्णय?

शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशा मागणीवर ते ठाम आहेत. यातच मुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com