Friday, April 26, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला विरोधकांवर निशाणा

सोलापूर | Solapur

राज्य सरकार प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट का दाखवत आहे? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारने राज्यांचे पैसे जर वेळेवर दिले तर राज्यांना केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावरआहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. या वेळी अक्कलकोट येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे शेतकऱ्यांचे राज्य आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांना नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला जे जे शक्य आहे ते सर्व केले जाईल. राज्यात कधी नव्हे तो इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे या संकटातून सावरायला थोडासा अवधी लागेल. परंतू, दोन-तीन दिवसांमध्ये पाहणी करुन योग्य ती मदत केली जाईल, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या