चर्चा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठविलेल्या खरमरीत पत्राची

चर्चा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठविलेल्या खरमरीत पत्राची

मुंबई | Mumbai

'कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्रातून (letter) उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...

राज्य सरकाराने विधानसभा निवडणुकीसाठी तीन पत्र पाठवली. तसेच शिष्टमंडळाने राज्यपालांची राज्यपालांची भेट घेत विनंती केली. पण तरीही राज्यपालांनी सही केली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. राज्यपालांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये, आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत सरकार निवडणूक घेण्याबाबत भूमिका मांडली.

कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. विधिमंडळातील कायदे घटनेनुसार आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाही' असंही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना बजावले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com