Friday, April 26, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्च - माजी मंत्री राम शिंदे

मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्च – माजी मंत्री राम शिंदे

अहमदनगर | Ahmednagar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा अर्वाच्च आहे, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे, असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवर ते प्रतिक्रिया देत होते.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. करोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला. सध्या पाणी आहे तर वीज नाही, डीपी जळत आहेत, कुठलाही दूर दृष्टिकोन नसलेले सरकार असल्याचं राम शिंदे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या