मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला

मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा (Dasara Melava) काल पार पडला. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती...

बीकेसी मैदानावर 1 लाख 25 हजार तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 65 हजार शिवसैनिक आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते.

मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला
दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुंबईत मृत्यू

एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानाची जागा मोठी असल्याने या मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संख्या जास्त असणार अशी शक्यता होती. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्यात बाजी मारली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला
उद्धव ठाकरेंना धक्का; शिंदेंच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील 'या' दोन व्यक्तींची उपस्थिती

याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा पार पडली होती. मोदींच्या सभेला जवळपास 97 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com