मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खान होतात तेव्हा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संभाजीनगर | Sambhajinagar

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पैठणमध्ये (Paithan) जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी ठाकरे गटाला (Thackeray Group) अनेक टोले लगावले. मात्र या सभेतील एका विषयाची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे...

तो विषय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मारलेला एक डायलॉग. त्यांनी म्हटले की, एकदा शब्द दिला तर मी स्वत:चे देखील ऐकत नाही. हा सलमान खानचा (Salman Khan) डायलॉग मुख्यमंत्र्यांनी मारल्यानंतर सभेस उपस्थितांनी जोरदार जल्लोष केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, पैसे देऊन जमवलेली ही गर्दी नाही. प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे.

बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल तेच बोला. मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वत:चं ही ऐकत नाही, असे ते म्हणाले.

जेव्हा अन्याय झाला, मुस्कट दाबी झाली. सत्तेतील इतर घटकपक्षाकडून जे जे झालं ते सगळ्यांना माहित आहे. तेव्हा इतर आमदार म्हणाले असं झालं तर पुढे काही खरे नाही. तेव्हा मला वाटले भूमरे नाना बोलतील तसं धाडस करतील का? पण ते धाडसी निघाले.

आपला कार्यक्रम करण्याची तयारी झाली होती. पण 50 जण सगळ्यांना पुरुन उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो. माझ्यासोबत अनेक मंत्री होते. 50 आमदारांनी निर्णय घेतला हा जगातील एक इतिहास आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इटलीत अनन्याचे 'फूल टू एन्जॉय', ग्लॅमरस फोटो चर्चेत

ते पुढे म्हणाले की, 2 वर्षात सर्व नकारात्मकता पसरली होती. मी आणि देवेंद्र जी यांनी निर्णय घेतला. सर्व सण धुमधडाक्यात होऊ द्यात. लोकांसाठी शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केले. जिकडे जातो तिकडे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा मुख्यमंत्री आपल्यातलाच आहे असे सर्वाना वाटत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com