उदयनराजे राज्यपालांविरोधात आक्रमक; पंतप्रधान मोदी यांना भेटल्यावर म्हणाले...

उदयनराजे राज्यपालांविरोधात आक्रमक; पंतप्रधान मोदी यांना भेटल्यावर म्हणाले...

दिल्ली | Delhi

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात विरोधाची लाट पाहण्यास मिळाली. छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अशात आज उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

उदयनराजे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यानंतर २३ नोव्हेंबरला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. राष्ट्रपती यांच्या सचिवांनी गृहमंत्रालयाकडे पत्र पाठवलं आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातही पत्र पाठवण्यात आलं आहे. वाद वाढून, तेढ निर्माण होऊ नये ही भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि देशाची अस्मिता आहे.'

तसेच, 'राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून लवकरच तोडगा निघणं आवश्यक आहे. प्रक्रियेनुसार कारवाई होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रकरणाची तीव्रता माहिती आहे. सर्व खासदाराचं राज्यपालांवरील कारवाईबाबत एकमत आहे. भाजपाने राज्यपालांना सांगितलं नाही की, अशी वक्तव्य करा. पण, त्याला पक्ष जबाबदार नाही. राज्यपालांनी अद्यापर्यंत माफी मागितली नाही, ही खंत आहे,' असेही उदयनराजेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेड्युल व्यस्त असलेल्या त्यांना आज भेटायला आलेल्या २६ खासदारांना भेटण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ देता आला नाही. मात्र त्यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे. जे उत्तर दिलं जाईल त्याची माहिती पत्रकारांना देऊ असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com