माझ्यामुळे अडचण होत असेल तर...; उदयनराजेंचा भाजपला गंभीर इशारा

माझ्यामुळे अडचण होत असेल तर...; उदयनराजेंचा भाजपला गंभीर इशारा

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान होत असेल तर स्वस्थ बसणार नाही. माझ्यामुळे जर भाजपची (BJP) अडचण होत असेल तर मी पक्षीय कारवाईला देखील घाबरत नाही, असा इशारा छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) यांनी दिला आहे....

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. आता उदयनराजे यांनी भाजपलादेखील इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. राज्यपालांचे कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, महाराजांचे नाव घेऊ नये. 3 तारखेनंतर राज्यपालांच्या विरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढवणार आहे.

माझ्यामुळे अडचण होत असेल तर...; उदयनराजेंचा भाजपला गंभीर इशारा
LPG सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या नवीन दर

प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मला खात्री आहे राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायलाच हवा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com