राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे; उदयनराजे आक्रमक

राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे; उदयनराजे आक्रमक

मुंबई | Mumbai

'समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजीची नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते.' असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले आहे.

दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी न्यायालयाची कागदपत्रं ट्विट करत राज्यपालांचं म्हणणं खोडून काढलं आहे. आता या वादात खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनीही उडी घेतली आहे.

राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे; उदयनराजे आक्रमक
राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या 'त्या' विधानानं नव्या वादाला तोंड फुटणार?

खासदार उदयनराजेंनी ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊ (Jijau) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असं आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिलाय.

राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे; उदयनराजे आक्रमक
शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवा; भाजपच्या 'या' आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

'आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते... चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे.' असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

'संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि व्होटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे.' असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com