भिडे वाड्यासंदर्भात छगन भुजबळांचा सवाल; एकनाथ शिंदे म्हणाले, या कामासाठी...

भिडे वाड्यासंदर्भात छगन भुजबळांचा सवाल; एकनाथ शिंदे म्हणाले, या कामासाठी...

मुंबई | Mumbai

भिडे वाड्याच्या (Bhide Wada) प्रश्नावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. येत्या १० तारखेला या प्रश्नावर पुन्हा सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूंना रेडीरेकनर तसेच बाजारमुल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्या मार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तरात दिली आहे. त्यामुळे भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून भारतातील महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.

भिडे वाड्यासंदर्भात छगन भुजबळांचा सवाल; एकनाथ शिंदे म्हणाले, या कामासाठी...
Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

त्या ऐतिहासिक शाळेचे भिडे वाड्यात पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. सरकार बदलल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यात कालबध्द कार्यक्रम ठरवून दोन महिन्यात या ठिकाणी भूमिपूजन करू, असे ठरविण्यात आले. मात्र तसे घडले नाही. न्यायालयात चालू असलेल्या केसवेळी मी स्वतः उपस्थित राहून वकिलांशी चर्चा केली.

गाळाधारकांना योग्य मोबदला दिल्यास ते ही केस मागे घेण्यास तयार आहेत. मात्र शासनाकडून विलंब होत आहे. येत्या १० मार्चला पुन्हा याबाबत तारीख आहे. त्यामुळे शासनाने भिडे वाड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुठल्या ठोस उपाययोजना केल्या आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भिडे वाड्यासंदर्भात छगन भुजबळांचा सवाल; एकनाथ शिंदे म्हणाले, या कामासाठी...
'तो' संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने केलं होत अलर्ट

यावेळी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, येत्या १० तारखेला या प्रश्नावर सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूना रेडीरेकनर तसेच बाजारमुल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भिडे वाड्यासंदर्भात छगन भुजबळांचा सवाल; एकनाथ शिंदे म्हणाले, या कामासाठी...
कांदा मुद्द्यावरून विधानसभेत घमासान; भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी

या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचा अहवाल कोर्टास सादर करून हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार चेतन तुपे यांनी देखील आग्रही भूमिका मांडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com