Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण; म्हणाले...

Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार व राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची काल (रविवारी) एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमधील आवाज भुजबळांचाच असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या क्लिपची मोठी चर्चा झाली. शिवाय ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळांनी थेट "ओबीसी काही वाचणार नाही आता" असे म्हटले होते. त्यासंदर्भात आता छगन भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे...

Minister Chhagan Bhujbal
Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतींचे निकाल हाती; पाहा विजयी सरपंच,सदस्यांची यादी

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना म्हणाले की, "सगळीकडे ओबीसी (OBC) आरक्षणावर आक्रमण चालू आहे. आमदारांची (MLA) घरे पेटवली जात आहेत.ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेलं देखील पेटवली जात आहेत. यासंदर्भात आपण कुणीतरी बोलले पाहिजे. ते एका आवाजात बोलले पाहिजे. जसे इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसेच मीही ओबीसींमधल्या ३७५ जातींना आवाहन करू शकतो की, आपणही आपले दु:ख एकमुखाने मांडले पाहिजे", असे छगन भुजबळांनी सांगितले.

Minister Chhagan Bhujbal
राज्यातली एसटी सेवा सुरळीत सुरु; मंत्री उदय सामंतांसोबत मागण्यांबाबत बैठक

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ दुसऱ्या एका व्यक्तीशी फोनवर बोलत असून समोरची व्यक्ती आपण तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास भुजबळाना देताना ऐकू येत आहे. ही सगळी मंडळी आली आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोच आहे की आता आवाज उठवा. एकतर आपण कुठपर्यंत लढणार. गावागावात त्यांचे बुलडोझर चालतायत. त्यात ओबीसी काही वाचणार नाही आता. त्यामुळे आता करेंगे या मरेंगे. हेच सगळ्यांनी करायला पाहिजे. असंही मरतंय, तसंही मरतंय. दुसरं काय. त्यांचं सगळं झालं. मी उभा राहतोय", असे भुजबळ या क्लिपमध्ये म्हणताना ऐकू येत आहे.

छगन भुजबळ आज बीड दौऱ्यावर

छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते समता परिषदेचे बीडचे जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांच्या सनराईज हॉटेलला भेट देणार आहेत. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मराठा आंदोलकांनी हे हॉटेल पेटवले होते. तसेच या हॉटेलची पाहणी करणार आहेत. त्यासोबतच बीड शहरात झालेल्या हिंसाचारात जयदत्त क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांचे घर आंदोलकांनी पेटवून दिले होते. या दोन्ही नेत्यांच्या घरांनाही भुजबळ भेट देणार आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Minister Chhagan Bhujbal
Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना झोडपणार
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com