Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याछगन भुजबळांनी वाचला मुंबईच्या प्रश्नांचा पाढा

छगन भुजबळांनी वाचला मुंबईच्या प्रश्नांचा पाढा

मुंबई | Mumbai

मुंबई शहराचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी मुंबई (Mumbai) स्वच्छ व सुंदर ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरातील शाळा, रुग्णालय, मंड्या, फुटपाथ हे स्वच्छ ठेवावे. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यात यावा…

- Advertisement -

तसेच मुंबईची स्काय लाईन खराब होऊ नये यासाठी अनावश्यक स्काय वॉक काढून टाकण्यात यावे. मुंबई स्वच्छ सुंदर राहिली तरच तीच वैभव कायम राहील त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोधी पक्षाने नियम २९३ मांडलेल्या प्रस्तावावर बोलतांना केली.

छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक गोष्टीत आपण सर्वांच्या पुढेच असतो मात्र प्रदुषणाच्या बाबतीत पण सर्वात पुढे आपण गेलेलो आहोत. मुंबईत हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवा प्रदुषित- ठोस उपाययोजना होतांना दिसत नाही. सगळीकडे बांधकामे रात्रंदिवस सुरु आहे.

शिंदे गटातील सर्व परत येतील, मात्र एकनाथ शिंदेंना..; संजय राऊतांचा नाशकात मोठा दावा

गाड्यांचे प्रमाण देखील वाढले – लोकांना श्वसनाचे त्रास होतोय. मागच्या वर्षापासुन ही परिस्थीती आहे. राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मग मुंबई विभाग नेमकी काय करतंय असा सवाल आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी धोक्याचे चिन्ह ओलांडत असतानाही नगण्य कारवाई झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कळवण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

कायद्याने कलम ३१ ए अंतर्गत मंडळाला आणखी अधिकार दिले आहेत, ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तसंच, दोषी ठरवल्यानंतर प्रत्येक दिवसांसाठी पाच हजारापर्यंतचा दंड होऊ शकतो. हवा प्रदुषित आहे तसेच आवाजाच्या प्रदुषणाचा सुद्धा सोक्ष – मोक्ष लागला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या