ओबीसींच्या आकडेवारीवरून बैठकीत अजित पवारांसोबत खडाजंगी?; छगन भुजबळ म्हणाले....

ओबीसींच्या आकडेवारीवरून बैठकीत अजित पवारांसोबत खडाजंगी?; छगन भुजबळ म्हणाले....

मुंबई | Mumbai

ओबीसी प्रश्नाच्या मुद्द्यावर काल झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याच खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

ओबीसी बैठकीत अजित पवार आणि माझ्यात काही मतभेद नाही, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांना दिले. भुजबळ म्हणाले की, एका घरामध्ये देखील दोन भावांमध्ये देखील चर्चा होत असतात. तशी चर्चा झाली, अजितदादांना सेक्रेटरींनी चुकीचं मार्गदर्शन केल्याने ते तसं बोलेले, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

ओबीसींच्या आकडेवारीवरून बैठकीत अजित पवारांसोबत खडाजंगी?; छगन भुजबळ म्हणाले....
१५ दिवसांत चमत्कार घडणार, शरद पवार भाजपसोबत येणार अन् अजितदादा...; रवी राणांचा मोठा दावा

छगन भुजबळ म्हणाले, मला उत्फुर्तपणे बोललो की, तुमच्याकडे माहिती नाही, असे होऊ शकत नाही. कारण एसटी, एससी, ओबीसी, वीजे, एनटी हे सगळे तुम्हाला घ्याईचेच आहेत आणि ही माहिती तुमच्याकडे असणारच. त्यावरून थोडेसे, अर्थात फार मोठा पराचा कावळा काल करण्यात आला. आमच्या असे काही मतभेद नाही. आपण असे सुद्धा चर्चा करतान एखाद्याची माहिती चूक असेल. आपण एकमेंकांना बोलतो. मोठ्या आवाजा बोलतो की मुद्दा ठामपणे मांडतो. ऐवढाच त्याचा अर्थ आहे. त्याप्रमाणे मी माझा मुद्दा पुन्हा एकदा मांडला आणि सांगितले की, अजित दादा हे बरोबर नाही हे असेच आहे. यानंतर फडणवीसांनी सांगितले की, आपला जो आयोग आहे. ओबीसी आयोगाकडू पूर्ण माहिती पुन्हा घेऊ. यामुळे तो मुद्दा तिथे संपलेला आहे. मी हे सचिवाना देखील पाठविले.

ओबीसींच्या आकडेवारीवरून बैठकीत अजित पवारांसोबत खडाजंगी?; छगन भुजबळ म्हणाले....
Crime News : पत्नीनेच केला पतीचा खून केला; भावाच्या मदतीने काढला काटा

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, दलिती, आदिवासी, ओबीसी आणि ओपन यात कशी आणि किती भरती झालेली आहे. हे मांडले आणि त्यांचे टक्केवारी बैठकीत मांडले होते. तो विषय आता संपलेला आहे. यानंतर मी काल ऐकत होतो की, लोकांनी जुन्या गोष्टी उकरुण काढण्याचा प्रयत्न केला. मग असे भांडण झाले आणि तसे भांडण झाले होते. पण एका घरामध्ये दोन भावांच्या चर्चा होत असतात. तशी चर्चा आमची झाली. तरी सुद्धा अजित दादांना सचिवाने चुकीचे मार्गदर्शन केल्यामुळे ते बोलले. तो विषय संपला असून आता फार मोठे खिड्डार, भानगड आणि अंतर्गत लढाई, असे काही नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com