Saturday, April 27, 2024
Homeनाशिकराज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? छगन भुजबळांचा...

राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? छगन भुजबळांचा बाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यातील प्रत्येक घटकाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीच फार मोठं काम केलं. म्हणून पवार साहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे….

- Advertisement -

अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव घेण्यात वावगे काय आहे, शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाहीत? अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

रत्नगिरी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्यानंतर आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी समाचार घेतला.

Cyclone Mocha : ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार! राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्या सोबत १९९१ सालापासून आहे. पवार साहेब हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पवार साहेबांची प्रकट मुलाखत घेतली त्यात त्यांनी हा प्रश्न विचारला होता.

त्यावेळी पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले की, महाराष्ट्र म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे आहे. महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेतलं असे त्यांनी यावेळी सांगितले.

Kerala Boat Tragedy : पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, २१ जणांचा मृत्यू… बचावकार्य सुरू

फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीमध्ये मोठ योगदान दिलं. म्हणून पवार साहेबांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर यांना मानतात.

दिल्लीत आपले जे ही नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी असे उत्तर पवार साहेबांनी राज ठाकरे यांना दिले असल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहे ती पुस्तके मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात कुठे बिघडते? अशी टिपणीदेखील भुजबळ यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या