"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल

"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल

नाशिक | Nashik

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असून भिडेंविरोधात राज्यभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्री शिंदेंनी केली नाशिक-मुंबई महामार्गाची पाहणी; अधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश

तर दुसरीकडे काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांकडून भिडे यांच्याविरोधात आंदोलने केली जात असून त्यांच्या या वक्तव्याविरोधात अमरावतीत (Amravati) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून देखील संभाजी भिडेंच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल
Nashik Crime News : दुचाकी चोरणारा २४ तासात जेरबंद; पंचवटी पोलिसांची कामगिरी

यावेळी भुजबळ म्हणाले की, आम्ही सुद्धा संभाजी भिडे यांच्यावर केस केली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी आंबा (Mango) खाल्ल्याने मुलं होतात असा दावा केला होता. या प्रकरणात आम्ही केस केली, मात्र कोर्टात ती केस पुढे ढकलली जात आहे. ज्या पद्धतीने महात्मा फुलेंवर टीका करतात, तसेच आता महात्मा गांधींवरही टीका करतात. माझी खात्री आहे की पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील हे आवडणार नाही, असे भुजबळांनी म्हटले.

"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लागणार धक्कादायक निकाल; कोणाचे नुकसान? कोणाचा फायदा?

पुढे बोलताना भुजबळांनी म्हटले की, महात्मा गांधींना अख्ख जग नमन करतो. मी अनेक ठिकाणी गेलो असून जगात असा एकही देश नसेल की जिथे महात्मा गांधी यांचे विचार पोहोचले नाहीत. जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा (Statue) नाही. त्या महात्मा गांधींवर किती गलिच्छ स्वरुपाची टीका करतात, त्यामुळे महात्मा गांधी यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे कोणालाही आवडणार नाही, असे भुजबळांनी सांगितले.

"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल
VIDEO : महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

तसेच महात्मा गांधींना अशा रितीने बोलले तर देशातीलच नाहीतर गुजरातमधील कोणताच बांधव-भगिनी सहन करील का? त्यामुळे भिडेंवर कडक कारवाई व्हावी या मताचा मी आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवनवीन बोलतात असे भुजबळ यावेळी म्हणाले.

"माझी खात्री आहे की..."; छगन भुजबळांचा 'त्या' वक्तव्यावरून संभाजी भिडेंवर हल्लाबोल
शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरातील पूर टळला; मंत्री केसरकरांचं वक्तव्य चर्चेत

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?

संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असे विधान केले होते. "मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले", असे संभाजी भिडे म्हणाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com