Chhagan Bhujbal : "तर लाठीचार्जनंतर..."; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal : "तर लाठीचार्जनंतर..."; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

पुणे | Pune

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) आमनेसामने आले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. तर दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राजकीय ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवत राज्यभर ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांचा पुण्यातील इंदापूर तालुक्यात मेळावा पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगेंवर जोरदार टीकास्त्र सोडले...

Chhagan Bhujbal : "तर लाठीचार्जनंतर..."; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : ...तर निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, मी काही बोललो की, काही विद्वान लोक बोलायला लागतात की दोन जातीत भांडणे लागत आहेत. जरांगे यांच्या सभा रात्री उशिरा चालतात, पोलीस कारवाई करीत नाही. कायदा फक्त आपल्याला त्यांना (जरांगे) नाही. मी मनोज जरांगेंना १५ दिवसांनी उत्तर दिलं तरीही लगेच आरोप केले जातात. छगन भुजबळांमुळे अशांतता वाढते आहे. मी मनोज जरांगेंना १५ दिवसांनी उत्तर देतो कारण सौ सुनार की एक लोहार की! अशांतता कोण निर्माण करतं आहे? त्याचा विचार सगळ्यांनी करायला हवा, असा सवाल भुजबळांनी केला.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे उत्तर दिलं ते वाचून दाखवत बीडमध्ये (Beed) पोलिसांना (Police) मारहाण झाली हेदेखील छगन भुजबळांनी वाचून दाखवलं. हे सत्य वेळीच समोर आलं असतं तर मनोज जरांगे पाटील यांना सहानुभूती मिळालीच नसती असेही भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal : "तर लाठीचार्जनंतर..."; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
Nashik News : सिन्नरच्या शेतकऱ्यांचा निळवंडेच्या पाण्यासाठी समृद्धीवर रास्ता रोको

पुढे ते म्हणाले की, आरक्षणावर (Reservation) अनेक नेते बोलायला तयार नाहीत. त्यांना कसली भीती वाटते आहे? मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत आमच्याकडे नाहीत का? त्यांची २० टक्के आणि ८० टक्के आमची आहेत. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का? याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. सगळे शांत बसले आहेत का? निवडणुकीसाठी? परंतु त्यांनी बोलले पाहिजे. आम्हाला २७ टक्के आरक्षण आहे. यात अनेक जाती आहेत. सरकारमध्ये फक्त आम्हाला ९ टक्के आरक्षण आहे. ते २७ टक्के भरा मग बाकीचे काही करा. लोकसेवा आयोगात ८५ टक्के मराठा समाज आहे, सारथी, अण्णाभाऊ साठे, ईडब्लूएसमधील ८५ टक्के मराठा समाजाचे, कुणबी आहेत ते आमच्यात आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal : "तर लाठीचार्जनंतर..."; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
INDIA Alliance : इंडिया आघाडीची रद्द झालेली बैठक आता 'या' तारखेला होणार

भुजबळ पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? कायदा सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी कुणाची? जालना यथे महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला. मग पोलिसांनी लाठीचार्ज केला असे मी अनेक दिवसांपासून सांगत आहे. पण कोणीच काही बोलायला तयार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनात सभागृहात लेखी उत्तर दिले आणि ज्यात त्यांनी ७९ पोलीस जखमी झाल्याचे म्हटले. बचाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात ५० जण जखमी झाले. हे आधीच समोर यायला पाहिजे होते. ते आता समोर आले आहे, असेही भुजबळांनी म्हटले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com