
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राष्ट्रवादीचे सर्व आमदार (NCP MLAs) आमच्या संपर्कात आहेत ते रिचेबल (Reachable) आहेत. यातील अनेकजन मुंबईत (Mumbai) आहेत. शिवसेनेचे (Shivsena) काही आमदार नॉट रिचेबल (not reachable) आहेत. तेही लवकर परत येतील असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते....
पहाटेपासून महाराष्ट्रात (maharashtra) मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे क्रमांक दोनचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांच्या समवेत सुरत येथे गेले आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्याकडूनच ऑफर देण्यात आल्यामुळे राज्यातील सत्ता जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेले दिसून येत आहे. नेत्यांना मिडियासोबत बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज दुपारी छगन भुजबळ यांना माध्यमांनी दुपारी गाठल्यानंतर ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्व आमदार संपर्कात आहेत.
दुसरीकडे जयंत पाटील यांनीदेखील माध्यमांशी बोलताना आपले सर्व आमदार मुंबईत असल्याचे सांगितले असून सर्व रिचेबल असल्याचे म्हटले आहे. आमदारांची जी दुपारी बैठक झाली ती कामाच्या निमित्ताने होती असेही ते म्हणाले.