गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे.
एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या भाजपाच्या हाती येतील. भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
पण काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडणं त्यांना शक्य होणार नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसला ही मतं मिळाली होती.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज (८ डिसेंबर) मतमोजणी होत असून लवकरच येथे कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.