Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रशेखर बावनकुळेंचा 'त्या' विधानावरून 'यू-टर्न'

चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘त्या’ विधानावरून ‘यू-टर्न’

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार आहे, असे विधान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी केले होते. आता त्यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे…

- Advertisement -

288 जागा भाजप-शिवसेना युती लढेल आणि 200 जागा जिंकेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. त्याचवेळी आपण बोललो त्याचे अर्धेच दाखविण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

लाल वादळ शमलं! सरकारच्या आश्वासनानंतर लॉन्ग मार्च स्थगित

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेना आणि भाजप 288 जागा युतीत लढणार आहे. आमचे एनडीए घटक पक्ष त्यातही असतील. राष्ट्रीय नेत्यांचच्या नेतृत्वात आम्ही 200 जागा आम्ही जिंकणार आहोत. महाविजय 2024 असेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अवकाळी पावसाचे राज्यात पाच बळी

पूर्वी युतीला मिळाल्या नाही तेवढा मोठ बहुमत आम्हाला मिळेल. त्याच्या तयारीची आमची बैठक होती. मात्र, काही विपर्यास करुन क्लिप दाखवण्यात आली आणि त्यातील अर्धा भागच होता. 288 जागा भाजपा-शिवसेना युती लढेल आणि 200 जागा जिंकेल, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या