Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”; थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

“आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”; थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वादानं परमोच्च बिंदू गाठला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतंय.

- Advertisement -

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबेंना मदत करुन त्यांना विधानपरिषदेत भाजपनं मदत केली. त्यामुळं सत्यजीत तांबेंना आम्ही ऑफर दिलेली नाही, पण त्यांना जर वाटलं तर भाजपत त्यांना प्रवेश करायचा आहे. तर त्यांचं स्वागत आहे, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत.’

तसेच, ‘आम्ही आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणं. पण सत्ता हे आमच्यासाठी साध्य नाही साधन आहे हा भाजपचा मूलमंत्र आहे. बाळासाहेब थोरातांना मी व्यक्तिगत ओळखतो. त्यांच्या रक्तात काँग्रेस असून त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं, अशा वेळी नेतृत्वाला नाराजी येत असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे,’ असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी नाशिक पदविधर मतदारसंघाचा निकाल लागला त्याच दिवशी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत एक अहवालही हायकमांडकडे पाठवल्याचे समजते. त्यामुळे हायकमांड आता थोरात यांची मनधरणी करणार की पक्षात नवे धोरण अवलंबणार याबाबत उत्सुकता आहे. पदविधर मतदारसंघ निवणुकीत खास करुन नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या.

पक्षांतर्गत कलह, संघर्ष आणि शह-काटशहाचा पूरेपूर प्रयत्न या निवडणुकीत पक्षांतर्गत झाला. त्यातून सत्यजित तांबे या युवक काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेल्या नेत्यावर निलंबनाची कारवाई झाली. या सर्व घडामोडींवर बाळासाहेब थोरात यांनी सूचक मौन बाळगले होते. जे त्यांनी थेट निकालाच्या दिवशीच सोडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या