
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिवसेनाप्रमुखांनी तुम्हा दोघांना वाचवलं. त्याचे पांग तुम्ही फेडत आहात काय? तुम्ही मला संपवायला निघाला आहात. मला संपवूनच दाखवा, असे आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एका मुलाखतीतून सडकून टीका केली...
या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना अल्झायमर झाला आहे. त्यांनी न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्यावेत, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवले. अडीच वर्षात अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावे वाटले नाही. ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षात काय केले? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणे केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदींवर केलेली भाषणे तुम्हाला आठवतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.