याकुब मेमन कबर सजावटीवरून भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

याकुब मेमन कबर सजावटीवरून भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

मुंबई | Mumbai

दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीची सजावट केल्याने मोठा वाद उफाळत आहे. कबरीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तत्काळ कारवाई केली आहे. या कबरीवरुन एलईडी लाईट्स हटवण्यात आले आहेत...

या प्रकरणाला आता राजकीय रंग लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देशद्रोही याकुब मेमनच्या कबरीचे करोना (Corona) काळात सौंदर्यीकरण झाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटायला वेळ नव्हता, अशावेळी त्यांनी याकुब मेमनच्या कबरीला अलिखित परवानगी दिली.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी आपले हिंदुत्व किती बदलले हे यावरुन स्पष्ट होत आहे. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

याकुब मेमन कबर सजावटीवरून भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
दहशतवादी याकुबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; मुंबई पोलिसांची कारवाई

भाजप सरकारला (BJP Government) विनंती करत आहे की ज्यांनी सुशोभिकरण केले त्यांना तातडीने शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही आणि मग हे केले.

याकुब मेमन कबर सजावटीवरून भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी हे कॉम्प्रमाईज का केले याचे उत्तर द्यायला हवे. तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी काय केले? राज्याचे मुख्यमंत्री का गप्प बसले, त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावे लागले का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com