Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयशरजील उस्मानीच्या वक्तव्याचा वाद; चंद्रकांत पाटलांचे थेट योगी आदित्यनाथांना पत्र

शरजील उस्मानीच्या वक्तव्याचा वाद; चंद्रकांत पाटलांचे थेट योगी आदित्यनाथांना पत्र

मुंबई l Mumbai

पुण्यात ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत (elgar parishad) शरजील उस्मानीच्या (Sharjeel Usmani speech) भाषणावरून राजकारण तापले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार शरजीलवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय? खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींची तडजोड करणार आहात? यावर तुम्ही टीप्पणी कराल, यांच्याकडे सरकार नाही तर झोप लागत नाही. आमचे अतिशय उत्तम कामे चाचली आहेत. व्यवस्थित सेवा, आंदोलने सुरु आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. दरवेळी सरकार नाही म्हणून झोप येत नाही, असं गुळगुळीत वाक्य म्हणू नका. कारवाई करणार की नाही ते सांगा’, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसेच ‘हिंदू समाज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात मोठ्या संख्येत आहे. कुणीतरी एक मुलगा येऊन काहितरी बोलून जातो. त्यावर समाजाने कारवाई करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे का? याप्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून काहीच कारवाई झालेली नाही. आम्ही कायद्या बाहेरील कारवाई मागत नाहीत. पण कायद्याअंतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही. शरजील उस्मानी हा मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला आम्ही पत्र लिहिलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले आहे’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय पत्रात?

चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ‘अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना हिंदू समाजाबाबत अत्यंत अपमानकारक भाषा वापरली आहे. ‘आजचा हिंदू समाज सडला आहे’, अशा वाक्यांचा त्यात समावेश आहे. त्याने समाजात तेढ निर्माण करण्याच्या भावनेतूनच अशा प्रकारची भाषा वारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या संविधानिक संस्थांविरोधातील ही भाषा म्हणजे राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचली आहे. शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील सिधारी भागातील स्थानिक रहिवाशी आहे. त्यानं केलेल्या अक्षेपार्ह विधानांना आता ५ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकार त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही अशी राज्यातील जनतेला खात्री आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लवकरात लवकर शरजील इमामविरोधात एफआयआर दाखल करुन त्याला अटक करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, ‘हिंदू सामाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, असं पत्र चंद्रकात पाटील यांनी योगी आदित्यनाथांना पाठवलं आहे.

दरम्यान, एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी मोठी टीका झाल्यानंतर आता स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून घेण्यात येत असलेली एल्गार परिषद ही नेहमीच वादात सापडली आहे. त्यातच यंदाही शरजील उस्मानी या तरुणाच्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य शरजील याने एल्गार परिषदेत बोलताना केलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या