Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाय म्हणाले चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर?

काय म्हणाले चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर?

पुणे

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर्गत नाराजी आणि त्यांच्या पक्षांतरबाबत दररोज उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच एकनाथ खडसे आपली पक्षातील नाराजी उघडपणे बोलू लागले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे एकनाथ खंडसे यांनी बंद खोलीत थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे(वाहिन्या) वापरू नये असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. आता गुलांबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे असे म्हटले आहे त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी, नाथाभाऊंनी वारंवार सांगितले आहे की ज्या पक्षात मी वाढलो, मोठा झालो त्या पक्षाचे नुकसान मी करणार नाही. मात्र, तरीही तुमचा गुलाबरावांवर विश्वास आहे, आमच्या नाथाभाऊंवर नाही अशी मिश्किल टिप्पणी पत्रकारांशी बोलताना केली.

उद्धव ठाकरे जागे व्हा

राज्यात राज्यात लहान मुली, गतीमंद मुली, कोविड सेंटरमधील तरुणी आणि महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर कोणत्याही प्रकाराची कारवाई होताना दिसत नाही. या सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो. पण एवढ्या घटना होऊन देखील राज्य सरकार, याकडे लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत अनेक वेळा निवेदन दिली. त्यावर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले जात नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करीत आहोत. तसेच या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

भाजपाच्यावतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, आजी माजी आमदार पदाधिकारी सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “उत्तर प्रदेशातील तरुणीबाबत घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. यातील आरोपींना पकडण्यात आले असून त्यांना कडक शिक्षा दिली जाणार असल्याचे, तेथील सरकारने जाहीर केले. मात्र, आपल्या राज्यात देखील अशा घटना घडत आहेत. त्याबद्दल मोर्चे किंवा कँडल मार्च का काढले जात नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या