Saturday, April 27, 2024
Homeराजकीयकोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक भाजपला धक्का; चंद्रकांत पाटील म्हणतात,...

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक भाजपला धक्का; चंद्रकांत पाटील म्हणतात,…

कोल्हापूर | Kolhapur

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक (Kolhapur Bypolls Result 2022) १२ एप्रिलला पार पडली. याच पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे.

- Advertisement -

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव (Jayashree jadhav) यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या (BJP) सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवावर भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल आहे की, ‘आम्हांला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसने ५० वर्ष केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही पाच वर्षात काय केलं हे मांडतो. मात्र आम्हांला राज्यात केवळ पाच वर्षे मिळाली. शहराच्या विकासासाठीचे अनेक प्रकल्प आम्ही केंद्राकडून मंजूर करुन घेतले आहेत. आता त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे विकास हाच आमचा मूळ मुद्दा होता.’ असं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या