Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रकांत पाटलांची 'त्या' वक्तव्यावर सारवासारव; म्हणाले...

चंद्रकांत पाटलांची ‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव; म्हणाले…

मुंबई | Mumbai

बाबरी मशीद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सारवासारव केली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील म्हणाले, बाळासाहेबांबाबत माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतील हिंदू जिवंत आहेत. बाबरी ही हिंदूंनी पाडली आणि त्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेनं केलं होतं. कोणत्याही एका पक्षाने पाडला नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘बाबरी पाडायला एकही शिवसैनिक नव्हता’; संजय राऊत म्हणतात, ‘आता डॉ. मिंधेंनी बोलावं’

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, माझा थेट प्रश्न होता की संजय राऊत कुठे होते? बाळासाहेबांबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. मुंबईत दंगली व्हायच्या तेव्हा जवळून बाळासाहेबांना पाहिलं. अयोध्येत बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा प्रश्न संजय राऊत कुठे होते हा आहे.

मातोश्रीशी आपण नेहमीच संपर्कात राहिलो, आम्हाला बाळासाहेबांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. आमच्या परिसरात दंगल झाली तर शिवसैनिक पंधरा-पंधरा दिवस सुरक्षित ठेवायचे. माझं प्रश्न असा होता की संजय राऊत कुठे होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम नेहमीच होतो. असंही ते म्हणाले.

बाबरी पाडली तेव्हाचे उंदीर आता खंदकातून बाहेर येत आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला हा आरोप मी सहन करणार नाही. मातोश्रीबद्दल जसा आदर आहे तसाच उद्धव ठाकरेंबद्दलही आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत जे काही आरोप केले त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणार नाही. त्यांना फोन करुन चर्चा करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या